Saturday, November 11, 2006

'जाणता राजा'

काल सुशांतबरोबर 'जाणता राजा' पाहिला. छान होतं नाटक. आमच्या माहितीप्रमाणे ते अशा प्रकारचे एकमेव नाटक असावे. भारतात. म्हणे या नाटकाची कल्पना पुरंदरे यांना ईटलीत पाहिलेल्या एका नाटकावरून आली.

माझ्या या मित्राने हे नाटक २-३ वेळा आधी पाहिले होते. तोच घेऊन गेला मला शिवाजी पार्कावर. नाटक होतं ६.४५ ला आणि आम्ही ६ लाच पोहचलो. जवळपास ६००० माणसांची व्यवस्था तेथे होती. ठीक वेळेवर नाटक चालू झाले. ह्या नाटकात अंदाजे २०० माणसे काम करतात. त्याशिवाय ४-५ घोडे आणि १ हत्ती सुद्धा होते.

एकंदर नाटकाचे आयोजन, प्रसंगांची निवड उत्तम होती. लाईट इफेक्ट्स मध्ये सुधारणेला बराच वाव आहे. काही ऎतिहासिक प्रसंग अजून वास्तववादी बनवता आले असते.

येताना 'अनुप्रास'मधून सिंगापुरी राईस खाल्ले. सुशांतच्यामते ते भारतीय मसाले वापरून केलेले होते.;) असो. मी नेहमीप्रमणे पाण्याची बाटली तिथेच विसरून आलो...
-----

Labels: , ,

1 Comments:

At 4:56 PM, October 01, 2007, Blogger Prabhakar Pandey said...

सुंदर जानकारी ।

 

Post a Comment

<< Home